Soybean oil prices slightly falling sugar also  
विदर्भ

गृहिणींनो, सोयाबीन तेलाच्या भावात घसरण, साखरेबाबतही गोड बातमी

राजेश रामपूरकर

नागपूर  ः इंधन दरात सतत वाढ होत असताना पाम तेलाची आयात वाढल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना सोयाबीन तेलासह राईस ब्रॅण्ड तेल, साखरेच्या दरात किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. नवीन पीक येऊ लागल्याने सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी तर राईस ब्रॅण्ड तेल एक ते सव्वा रुपयाने स्वस्त झाले. साखरेचे उत्पादन यंदा वाढणार असल्याने साखरेचे भावही प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेल प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांवर तर राईस ब्रॅण्ड तेल १२० ते २२२ रुपयांवर गेले होते. विदेशातून पाम तेलाची सुरू झालेली आवक आणि सोयाबीनचे नवीन पीक बाजारात येऊ लागल्याने दोन्ही तेलाच्या भावात घसरण झाली आहे. सोयाबीन तेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे शंभर ते सव्वाशे रुपयांनी घट झाली. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने किंचित का होईन परतु दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाजारात ग्राहकांची वर्दळ सामान्य होती. तूर डाळीसह उडीद, मूग डाळीच्या दरात किंचित वाढ झाली तर हरभरा डाळीच्या दरात घसरण झालेली आहे. तांदळाच्या दरात भाववाढ कायम आहे. राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढलेली असताना मागणीही वाढली आहे. त्यामुळे तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपयांची वाढ झालेली आहे. 

हरभरा डाळीचे भाव घसरणार
गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पाच लाख टन तूर डाळीची आयात होण्याची शक्यता होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ४ लाख ५० लाख टनच तुरीची आयात झाल्याने भाववाढ झाली. परिणामी सरकारची खरेदी होताच तुरीच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा पेरणी वाढल्याने हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात शेतात आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याचे संकेत मिळत असल्याने हरभरा डाळीचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
 प्रभाकर देशमुख, किराणा व्यापारी 
 
संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT